भीमा-कोरेगाव नक्षली कनेक्शन, पाच शहरी माओवाद्यांना अटक

71
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । पुणे

एल्गार परिषदेतील आयोजनामध्ये नक्षलवाद्यांचा सहभाग आणि आर्थिक मदत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी माओवाद्यांच्या थिंक टँकवरच हल्ला केला. मंगळवारी देशभरात एकाच वेळी मुंबई, ठाणे, हैदराबाद, रांची, फरिदाबाद, दिल्लीत छापेमारी करून टॉपच्या पाच संशयित शहरी माओवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी यापूर्वी पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत आणि पत्रव्यवहारांमध्ये तेलगू कवी वरवरा राव, अरुर परेरा, गौतम नवलखा, वर्णन गोन्सालवीस, सुधा भारद्वाज यांची नावे समोर आल्याने ही कारवाई केली. पोलिसांनी जप्त केलेल्या एका पत्रामध्ये तर नवलखाचा कश्मीरमधील फुटीरवाद्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

पुण्यामध्ये 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवारवाडा येथे एल्गार परिषद झाल्यानंतर दुसऱयाच दिवशी 1 जानेवारी रोजी भीमा- कोरेगाव येथे दंगल उसळलेली होती. एल्गार परिषदेच्या आयोजनातील सहभाग आणि बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याने पुणे पोलिसांनी सुधीर ढकळे, प्रा. शोमा सेन, रोना किल्सन, ऍड. सुरेंद्र गडलिंग आणि महेश राऊत या पाच जणांना यापूर्वीच अटक केली आहे. या पाच जणांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडील लॅपटॉप, कॉम्प्युटरमधून पुणे पोलिसांना सुमारे 200 ते 225 पत्रे सापडली आहेत. त्यामध्ये 31 डिसेंबर रोजी शनिवारवाडा येथे झालेल्या ‘एल्गार’ परिषदेत नक्षलवाद्यांचा सहभाग होता. त्यासाठी त्यांच्याकडूनच अर्थपुरवठा झाल्याने अनेक महत्त्वाचे पुरावे, कागदपत्रे, नक्षली नेत्यांमधील संवादाची पत्रे पुणे पोलिसांना सापडली आहेत. त्यावरून सध्याचा तपास सुरू आहे.

पोलिसांना सापडलेल्या पुराव्याच्या आधारे त्यांनी देशातील टॉपच्या माओवादी नेत्यांच्या घरी मंगळवारी धाडी टाकल्या. हैदराबाद येथून विचारवंत तेलगू कवी वरवरा राव, मुंबई येथून वर्णन गोन्सालवीस, ठाणे येथून अरुण परेरा, दिल्ली येथून गौतम नावखला, फरिदाबाद येथून सुधा भारद्वाज या पाच जणांना अटक केली. तर रांची येथे स्टॅन स्वामींच्या घरी केवळ छापेमारी केली, त्यांना अटक केली नाही. वरवरा राव हे विचारवंत असून, तेलंगणातील ते प्रसिद्ध कवी आहेत. बंदी असलेल्या माओकादी संघटनांना पाठिंबा दिल्याने आणि एल्गारच्या संदर्भाने त्यांचे पत्रव्यवहारात नाव आले आहे. गोन्झालिक्हज, पाररिया, भारक्दाज यांची चौकशी बंदी घातलेल्या माओकादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशय आहे.

आतापर्यंत 10 जणांना अटक
एल्गार परिषदेत आणि भीमा-कोरेगाव येथे भडकलेल्या दंगलीत नक्षलवाद्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. असे असताना एल्गार परिषदेच्या आयोजनातील सहभाग आणि पैशाचा पुरवठा याप्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक केली आहे. 6 जून रोजी रोना किल्सन, रिपब्लिकन दलित पँथरचे सुधीर ढकळे, नागपूर येथील ककील सुरेंद्र गडलिंग, प्राध्यापक सोमा सेना आणि महेश राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर आता वर्णन गोंसलविस, अरुण परेरा, गौतम नावखला, सुधा भारद्वाज आणि वरवरा राव यांना अटक केली आहे. यामुळे शहरी माओवाद्यांची मोठी लिंक समोर आली आहे. तर गोवा येथे आनंद तेलतुंबडे न भेटल्याने तेथील कारवाई हुकली.

या कलमांन्वये केली कारवाई
आज अटक केलेल्या पाच जणांवर भादंवि कलम 153अ, 505 (1), 117, 120 (ब) आणि यूएपीए कायद्यानुसार 13, 16, 18, 20, 38,39, 40 या कलमांन्वये कारवाई केली असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले.

एल्गार परिषदेच्या आयोजनासंदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी यापूर्वी पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आज दिल्ली, हैद्राबाद, फरिदाबाद, रांची, ठाणे, मुंबई येथे कारवाई करून पाच जणांना अटक केली. अटक केलेले सर्कजण माओकादी संघटनेशी संबंधित असून करिष्ठ माओकादी नेत्यांशी संपर्कात असल्याचे समोर आले आहे. या सर्वांचा माओवादी चळवळ सुरू जिवंत ठेवण्यामध्ये मोठा सहभाग आहे. हे सर्वजण माओवादी सेंट्रल कमिटीचे सदस्य आहेत. -शिवाजी बोडखे, सह आयुक्त, पुणे पोलीस

वरवरा राव –
कवी वरवरा राव हे देशातील टॉपचे माओवाद्यांचे समर्थक आहेत. कवी, विचारवंत म्हणून त्यांची ख्याती असल्याने त्यांच्या शब्दाला माओवाद्यांमध्ये वजन आहे.

अरुर परेरा –
अरूर परेरा यांना यापूर्वी नक्षलवाद्यांशी संबंधित प्रकरणात अटक झाली होती, त्यामध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सध्या ते वकिली करत आहेत.

वेरनॉन गोन्सालवीस –
वेरनॉन गोन्सालवीस हे सात वर्षे शिक्षा भोगून बाहेर आले आहेत. सध्या माओवाद्यांच्या अनेक चळवळीत सक्रिय.

गौतम नवलखा –
दिल्लीमध्ये गौतम नवलखा हे प्रसिद्ध नाव आहे. ते माओवाद्यांशी संबंधित असल्याचा संशय आहे. कश्मीरमधील फुटीरवाद्यांशीही संबंधित असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.

सुधा भारद्वाज –
सुधा भारद्वाज या देखील माओवाद्यांशी संबंधित आहेत. त्यांचाही उल्लेख पत्रव्यवहारात आहे.

प्रतिक्रीया – 

हे अटकसत्र म्हणजे जनतेच्या लोकशाही हक्कांवर हल्ला आहे. आणीबाणीपेक्षाही देशात भयंकर स्थिती आहे.सीताराम येचुरी, माकप सरचिटणीस

देशाला ‘हिंदू स्टेट’ बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणीबाणीपेक्षाही जास्त धोकादायक स्थिती आहे.अरुंधती रॉय, लेखिका

summary : Varavara Rao, Sudha Bharadwaj, Vernon Gonsalves arrested in bhima koregaon case

आपली प्रतिक्रिया द्या