पंढरपूरमध्ये झाली आषाढी वारी आढावा बैठक

72

सामना वृत्तसेवा । पंढरपूर

येत्या ४ जुलै रोजी होणार असलेल्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या नियोजनासाठी पंढरपूर मध्ये प्रशासकीय नियोजनाची बैठक पार पडली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. वारी सोहळ्यासाठी येणाऱ्या श्री विठ्ठल भक्तांना आवश्यक त्या मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाला पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या.

यावेळी वारकरी प्रतिनिधींनी वारीच्या मार्गावर येणाऱ्या अडीअडचणी बैठकीमध्ये मांडल्या. वारकऱ्यांच्या सूचनांची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व पालख्यांना आवश्यक त्या सुविधा आणि मानसन्मान दिला जाईल, असे सांगितले.

जिल्हा परिषद विभागाचे सर्व कर्मचारी हे लाल किवा गडद रंगाच्या टी शर्ट मध्ये आषाढी एकादशी सोहळ्याच्या नियोजनासाठी कार्यरत राहणार आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी ही माहिती दिली. वारी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी पाच हजार पोलीस कर्मचारी आणि दोन हजार होमगार्ड कार्यरत असतील, असे जिल्हा पोलीस प्रमुख विरेश प्रभू यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या