गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

92

सामना प्रतिनिधी, संभाजीनगर

वैजापूर येथील सुंदर गणपती मंदिरात श्री गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त बुधवारी विविध कार्यक्रम घेण्यात आले. गजानन महाराज विजय ग्रंथ वाचन, ग्रंथ दिंडी, प्रतिमा मिरवणूक, प्रवचन व महाप्रसादाला भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

प्रारंभी आयोजक काशीनाथ आगाज व बेबी आगाज, भास्कर त्रिभुवन, धोंडिरामसिंह राजपूत यांनी ग्रंथ दिंडी पूजन केले. सलग चौथ्या वर्षी पालखीचे खांदे मानकरी असलेले मुस्लिम समाजातील गजाननभक्त अजीज कुरेशी व शकील तांबोळी यांनी पालखीला खांदा दिला.
महिला, मुली व मुलांनी दिंडीसमोर नृत्य, फुगडी, पावली खेळली. ह.भ.प. राधाकृष्ण महाराज भोपळे यांचे प्रवचन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी उत्सव समितीच्या वतीने शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाNया तीन भाग्यवान पारायणार्थी दाम्पत्याची चिठ्ठ्या टावूâन निवड करण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, साबेर खान, विशाल संचेती, प्रकाश चव्हाण, प्रकाश बोथरा, प्रेम राजपूत, पारस घाटे, इंदरचंद्र बोथरा, आमीर अली, सुलतान खान यांची उपस्थिती होती. डॉ. राजीव डोंगरे, डॉ. विजया डोंगरे, ज्ञानेश्वर इंगळे, महेंद्र काटकर, राम उचित, सुहास सोंनदे, गणेश अनर्थे, श्रावण चौधरी, श्याम पवार, राजू पुणे, सुरेश वडनेरे, अनंत अधिकार, बाळू पुणे, श्याम आगाज, संजय दाभाडे, कुणाल जगताप, सुशील आसर, राजू महापुरे, संजय अग्रवाल, दत्तात्रय जगताप, भारती सोनदे, नाना इंगळे, महायोद्धा ग्रुप व मोरया ग्रुपने सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन डी.डी. राजपूत, तर आभार श्रावण चौधरी यांनी मानले.

नाचनवेल येथे प्रकट दिन उत्साहात
नाचनवेल : येथे श्रीसंत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेच श्रींच्या मूर्तीस जलाभिषेक करून पूजन करण्यात आले. तद्नंतर एकवीस दिवे प्रज्वलित करून श्री गजानन महाराज महात्माचे मोहिनी पिंपळे यांनी वाचन केले. नंतर नैवेद्य व महाआरती करण्यात आली .यावेळी लक्ष्मी पिंपळे, संध्या पिंपळे, शैला पिंपळे, कामिनी पिंपळे, सरला पिंपळे, संगीता सुरडकर, शैला कुलकर्णी, काशीकला थोरात, शुभांगी पिंपळे, लता पिंपळे, माधुरी पिंपळे, पार्वती थोरात, प्रिया पिंपळे आदी उपस्थित होते. उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या