वरखेडे-लोंढे प्रकल्पांतर्गत पुनर्वसनासाठी 26 कोटींची तरतूद, 31 गावांना होणार लाभ

चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे-लोंढे प्रकल्पाच्या अंतर्गत तामसवाडी गावठाणाच्या पुनर्वसनासाठी तब्बल 26 कोटी रूपयांच्या तरतुदीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे 35.38 दलघमी इतक्या पाण्याचा साठा होणार आहे. यामुळे परिसरातील 31 गावांना लाभ होणार आहे. मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

आज सकाळी मुंबईत महाराष्ट्र राज्य पुनर्वसन आणि पुनर्स्थापना सनियंत्रण समितीची बैठक या समितीचे पदसिध्द अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात निमंत्रीत सदस्य या नात्याने राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची देखील उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या