
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वरुण धवनने आपल्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो पत्नी नताशासोबत दिसत आहे. रविवारी अलिबागमधील द मॅन्शन हाऊसमध्ये वरुण आणि नताशाचा विवाहसोहळा पार पडला.
फोटोमध्ये वरुण धवन आणि नताशा सिल्व्हर आउटफिटमध्ये दिसत आहेत. फोटोत वरुण आणि नताशाच्या मागे डेव्हिड धवन आणि लाली देखील दिसत आहे. वरुणने हा फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आयुष्यभराचं प्रेम आता अधिकृत झालं.’ वरुणचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करून त्याला शुभेच्छा देत आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या