दर्यादिल वरुण, जखमी डान्सरच्या उपचारासाठी 5 लाखांची मदत

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन याचा दर्यादिलपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. हिप हॉप डान्सर ईशान यांच्यावरील उपचारासाठी वरुणने 5 लाखांची मदत केली आहे. डान्सचा सराव करत असताना ईशान जखमी झाला होता.

डान्स कंपोजर कार्तिक राजा यांनी इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील डान्सर ईशानचा जखमी फोटो पोस्ट केला होता आणि मदतीसाठी आवाहन केले होते. ही पोस्ट निदर्शनास आल्यानंतर वरुणने त्याला पाच लाखांची मदत पाठवली. डबल फ्रंट फ्लिप करताना संतुलन बिघडल्याने ईशान खाली कोसळला होता आणि त्याच्या मानेला दुखापत झाली होती.

वरुण दिलदार, बारबार लगादार
चित्रपटनगरीमधील लोकांच्या मदतीसाठी धावून जाण्याची वरुणची ही पहिलीच वेळ नाही. 2015 मध्ये सुरेश मुकुंद यांच्या ग्रुपने वर्ल्ड हिपहॉप चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी वरुणने मदत केली होती. यावर आधारित ‘एबीसीडी -2’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता.