वरूणने पोलिसांसोबत दिली पोझ

756

लॉकडाऊनच्या निर्बंधात थोडी शिथिलता आल्यानंतर बॉलीवूड स्टार आता अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. सारा अली खानचा फिल्ममेकर आनंद राय यांच्या ऑफिसबाहेरचा असाच एक फोटो नुकताच व्हायरल झाला. आता अभिनेता वरुण धवन यालादेखील जुहू चौपाटीवर पापाराझ्झींनी कॅमेऱयात टिपलंय. बीचवर डय़ुटीवर तैनात असलेल्या मुंबई पोलिसांसोबत वरुणने फोटो पोझही दिली. मास्क लावलेल्या वरुणचा हा अंदाज फॅन्सला खूप आवडला आहे.

वरुणला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्सशी कनेक्ट व्हायला फार आवडतं असंच म्हणावं लागेल. लॉकडाऊनमध्ये आपलं काय चाललंय, हे फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून तो फॅन्सपर्यंत पोचवत असतो. मग घरातील वर्कआऊट असेल किंवा थ्रोबॅक फोटो असतील, वरुण घरबसल्या फॅन्सचे मनोरंजन करताना दिसून येतो. अलीकडेच त्याने त्याच्या आगामी ‘कुली नंबर 1’ सिनेमाचा नवीन पोस्टर कोरोना व्हायरस ट्विस्टसह शेयर केला होता. या सिनेमात सारा खानची मुख्य अभिनेत्री आहे.

आपली प्रतिक्रिया द्या