पुन्हा सलमानची ही भूमिका साकारणार वरुण धवन

23

सामना ऑनलाईन । मुंबई

जुडवा २ला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आता वरुण धवन सलमानची आणखी एक भूमिका साकारण्यास सज्ज झाला आहे. यावेळी तो १९९९ मध्ये आलेल्या बीवी नं. १ या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक बनवण्याच्या विचारात आहे.

बीवी नं. १मध्ये सलमान खान, करिश्मा कपूर आणि सुश्मिता सेन हे तीन कलाकार मुख्य भूमिकेत होते. याखेरीज अनिल कपूर आणि तब्बू यांच्याही त्यात भूमिका होत्या. एका जोडप्याच्या सुखी संसारात आलेली दुसरी स्त्री आणि तिच्या कचाट्यातून बायकोने नवऱ्याला परत मिळवण्याचा केलेला खटाटोप अशी या चित्रपटाची मूळ कथा होती. असं असलं तरीही कौटुंबिक चित्रपट म्हणून तो सुपरहिट झाला होता. आता या चित्रपटात वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. त्याच्यासोबत कोण असेल ते अद्याप ठरलं नसून पटकथेवर काम सुरू आहे.
पटकथा निश्चित झाल्यानंतरच चित्रपटाच्या उर्वरित कास्टिंगला सुरुवात होईल.

आपली प्रतिक्रिया द्या