वसईतील महिलेने केली कोरोनावर मात; उपचारानंतर झाली रोगमुक्त

438

वसई-विरारमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना एक दिलासा देणारी घटना घडली आहे. अमेरिकेहून मायदेशी परतलेली वसईतील 34 वर्षांची महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. त्या महिलने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. उपचारानंतर ती रोगमुक्त झाली असून तिच्या प्रकृतीतही सुधारणा झाली आहे.

वसई पश्चिमेकडील ही महिला एका विमान कंपनीत हवाईसूंदरी म्हणून कार्यरत होती. अमेरिकेहून मायदेशी परतल्यावर महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तिला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. मुंबईच्या कस्तूरबा रूग्णालयात 23 मार्चपासून तिच्यावर उपचार सुरु होते. उपचारानंतर ती आता पुर्णपणे बरी झाली असून तिचा वैद्यकीय अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तिला घरी सोडण्यात आले असून सुरक्षेसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या