वसई विरार कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 31, आतापर्यंत तिघांचा मृत्यू

490
वसई विरार शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत पून्हा शुक्रवारी दोन रूग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत पालिका क्षेत्रात 31 कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झालेला आहे.
विरार येथील एका पोलिस कर्मचा-याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले असून सदर कर्मचारी मरोळ येथे पोलिस ड्यूटीवर होता.तर दुसरा रूग्ण नालासोपारा येथील तरुण आहे. दोघांनाही उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एकूण महापालिका हद्दीत 28 रुग्ण कोरोना बाधीत तर ग्रामीण परिसरात 3 असे 31 रूग्ण सापडले असून  यामध्ये 3 रूग्ण मृत्यूमुखी पडले आहेत.सद्या जे कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत तेथील सर्व परिसर महापालिकेतर्फे सील करण्यात आले असून परिसर निर्जंतुक करण्यात आले असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या