वसईत लाॅकडाऊन दरम्यान टवाळखोर तरूणांनी भरधाव दुचाकीने पोलिस उपनिरीक्षकाला उडविले

1583

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अवघा देश लॉकडाऊन झाला असताना वसईत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रस्त्यावर बंदोबस्ताला असलेल्या वालिव पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्याला टवाळखोर तरूणांनी भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. यात सदर पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला असून त्याला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

वसई पूर्व एव्हरशाईन वाकनपाडा येथे बुधवारी सकाळी 11 वाजता पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या तरूणांना थांबविण्याचा प्रयत्न वालिव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील यांनी केला. त्यावेळी टोळक्यांनी भरधाव दुचाकी त्यांच्या अंगावर घातली. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या आयसीएस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी नागरीकांनी घराबाहेर पडू नये म्हणून देशभरात 21 दिवस लाॅकडाऊन केले असतात विनाकारण रस्त्यावर उतरणा-यांविरोधात पोलिस कारवाई करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या