कार अपघातात आई, वडील, मुलगा ठार

2164
प्रातिनिधिक फोटो

आजारी असलेल्या नातेवाईकाच्या भेटीसाठी जाणारे आई, वडील आणि मुलगा ट्रक-कारच्या अपघातात जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना नागपूर – संभाजीनगर महामार्गावर वाशिम जवळच्या चांडस नजीक घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वाशिम जिह्यातील सावरगांव बर्डे येथील मूळ रहिवासी आणि सद्यस्थितीत वाशिम इथं वास्तव्यास असलेले किसन कड (71), जिजाबाई कड (62) आणि मुलगा अमोल कड (30) हे तिघे जण डोणगांव इथे मुलगा अमोल कड यांच्या पत्नीचे माहेरकडील नातेवाईक आजारी असल्याने त्यांच्या भेटीसाठी कारने जात होते. चांडसजवळ भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आई, वडील आणि मुलगा हे जागीच ठार झाले आहेत. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. अपघात घडताच चांडस येथील ग्रामस्थ मदतीसाठी तात्काळ धावून आले. मात्र तोपर्यंत कारमधील तिघांचा मृत्यू झाला होता. अमोल कड हे पेशाने वकील होते तर त्यांचे वडील किसन कड हे सेवा निवृत्त बँक अधिकारी होते.

आपली प्रतिक्रिया द्या