
वडाच्या झाडाची स्त्रियांकडून सामुहिक पूजा करण्याचा प्रघात आपल्या संस्कृतीमध्ये फार प्राचीन काळापासून आहे. वडाच्या झाडामध्ये असलेले अनेक औषधी उपयोग बघता असे लक्षात येते की विशेष करून स्त्री वर्गासाठी वड हा वृक्ष अत्यंत आरोग्यदायी असा आहे.
1) उलटी होणे (स्त्री) – वडाच्या कोवळ्या पारंब्या बारीक उगाळून चाटवल्यास स्त्रियांना गरोदरपणात फायदा होतो.
2) उलट्या लागणे – 3 ते 6 ग्रॅम वडाच्या पारंब्या खाल्ल्यास उलटीचा त्रास नाहीसा होतो.
3) तळपायाला भेगा पडणे – भेगा पडलेल्या ठिकाणी वडाचे दूध (चीक) लावून मालिश केल्यास भेगा भरून येतात.
4) कंबरदुखी – वडाच्या दुधाने (चीक) कमरेला दिवसातून तीन वेळा मालिश केल्यास कंबरदुखी राहते.
5) भाजले असल्यास – त्यावर गायीच्या दह्यात वडाची वाळलेली पाने वाटून लावल्यास दुखणं कमी होते आणि जखमही लवकर बरी होते.
6) केसांचे आजार – वडाची वाळलेल्या पानांची 20 ग्रॅम राख 100 मिलिलिटर जवसाच्या तेलात मिसळून कोमट करून डोक्यावर मालिश केली असता केसांचे आजार दूर होतात.
7) गर्भपात होणे – वडाची सुकलेली साल दुधाच्या साईसोबत घेतल्यास गर्भपात होत नाही. 5 ग्रॅम वडाची सुकलेली साल बारीक वाटून त्यात थोडा मध घालून दिवसातून दोन वेळा घेतल्यास गर्भपात होण्यापासून मुक्ती मिळते.