नव्या पाहुण्यांचे प्रचंड आकर्षण, राणीबागेत मुंबईकर- पर्यटकांची झुंबड

806

खुँखार तरस, आक्रमक बिबटय़ा, अस्वल, देशी-परदेशी पक्षी, कासव, भलामोठा अजगर, नाग असे नवे पाहुणे पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी मुंबईकर-पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे. रविवारी नवे पाहुणे पाहण्यासाठी चौदा हजार नागरिकांनी गर्दी केली. यामुळे पालिकेला एका दिवसात पाच लाखांवर महसूल मिळाला.

मुंबईचा निसर्ग, संस्कृती-परंपरेचे कायमस्वरूपी प्रदर्शन

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात निसर्ग आणि मुंबईची कला-संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवणारे कायमस्वरूपी प्रदर्शन सुरू करण्यात येणार आहे. राणीबागेच्या आधुनिकीकरणाच्या चौथ्या टप्प्यामध्ये सुरू होणारे हे प्रदर्शन इंटरप्रिटेशन सेंटर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सुरू करण्यात येईल.

याआधी हे प्रदर्शन राजस्थानमधील जयपूर येथे 19 ते 26 मार्च या कालावधीतील भरणाऱ्या ‘वर्ल्ड वाइल्डनेस काँग्रेस’मध्ये मांडण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी चार कोटी 36 लाख 60 हजारांचा खर्च करण्यात येणार आहे. यासाठी जनसंपर्क खात्याकडे पुरेसा निधी नसल्यामुळे आकस्मिक निधीतून खर्च करण्यात येणार असून या प्रकल्पाचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या