व्हिनस विल्यमच्या घरी चोरांचा ४ लाख डॉलरच्या वस्तूंवर डल्ला

8

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

स्टार टेनिसपटू व्हिनस विल्यमच्या घरी चोरी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. फ्लोरिडा येथील तिच्या राहत्या घरी चोरांनी तब्बल ४ लाख डॉलरच्या वस्तूंवर हात साफ केला आहे. १-५ सप्टेंबर दरम्यान व्हिनसच्या राहत्या घरी चोरी झाली असून या चोरीदरम्यान नेमक्या कोणत्या गोष्टी चोरीला गेल्या आहेत याबाबतची माहिती पोलिसांनी दिलेली नाही. या चोरी प्रकरणी पोलीस तपास करत असून कोणालाही अद्याप अटक केलेली नाही.

टेनिसच्या बाबतीत यंदाचं वर्ष व्हिनस विल्यमसाठी चांगलं होतं. जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये व्हिनस अंतिम सामन्यात पोहचली होती. तसेच अंतिम ग्रॅन्ड स्लॅम युएसए ओपनच्या उपांत्य फेरीमध्येही ती पोहचली होती.
व्हिनस डब्लयुटीएच्या अंतिम सामन्यामध्ये पोहचली होती. तेथे डेन्मार्कच्या कॅरोलिन वोज्नियाकीवर तिने मात केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या