व्हीनसने सेरेनाला हरविले

11

सामना ऑनलाईन । इंडियन वेल्स

सुपरमॉम सेरेना विल्यम्सने बाळाला जन्म दिल्यानंतर १५ महिन्यांनी कोर्टवर उतरून टेनिसमध्ये पूर्वीचा लौकिक मिळविण्यासाठी धडपतेय. मात्र मंगळवारी इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत सेरेनाला आपली मोठी बहीण व्हिनस विल्यम्सकडून हार पत्करावी लागली.

दहाव्या मानांकित व्हिनसने सेरेनाला ६-३, ६-४ असे सरळ सेटमध्ये हरविले. विल्यम्स भगिनींमध्ये २०१७च्या ऑस्ट्रेलिया ओपन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेनंतर प्रथमच लढत झाली. ऑस्ट्रेलिया ओपन जिंकल्यानंतर सेरेनाने गर्भवती राहिल्यामुळे टेनिस खेळणे बंद केले होते.

अमेरिका ओपन विजेती स्टीफेन्स पराभूत

अमेरिका ओपनची विद्यमान विजेती स्लोएने स्टिफेन्सला या स्पर्धेत मात्र तिसऱ्याच फेरीत पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. १९व्या मानांकित अमेरिकेच्या डारिया कासात्किनाने तिला बाहेरचा रस्ता दाखविला. बिगरमानांकित स्टिफेन्सने गतवर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेच्या मेडिसन कीसचा ६-३, ६-० असा पराभव करून अमेरिका ओपनचे विजेतेपद पटकाविले होते. पुरुष एकेरीत अव्वल मानांकित स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने सर्बियाच्या फिलीप क्राजिनोविचचा ६-२, ६-१ असा धुव्वा उडवीत आगेकूच केली.

आपली प्रतिक्रिया द्या