जगविख्यात जिमनॅस्टपटू बनली पॉर्न स्टार, सांगितले ‘हे’ कारण

6355

नेदरलँडची व्हेरोना वॅन डे लेऊर ही जिमनॅस्टीकपटू एकेकाळी जगभरातील प्रख्यात क्रीडापटू म्हणून ओळखली जात होती. 2002 साली स्टुगार्टमध्ये झालेल्या जिमनॅस्टीक विश्वचषक स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावलं होतं. प्रतिभावंत क्रीडापटू म्हणून तिच्याकडे पाहिलं जात होतं. सुवर्ण कामगिरी केल्याने तिला स्पोर्टस वुमन ऑफ द इयर पुरस्कारही देण्यात आला होता. मात्र आज ही जिमनॅस्टीकपटू पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करते आहे. हे ऐकून आणि तिचे व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

व्हेरोना 33 वर्षांची आहे. तिने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तिच्या देशाला 8 पदके मिळवून दिली आहे. तिच्या देशामध्ये तिच्याकडे अभिमानाने बघितले जात होते. मग असं नेमकं काय झालं की तिने हे क्षेत्र सोडून पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवला हे अनेकांना कळायला मार्ग नव्हता. तिच्या पडत्या काळाची सुरुवात 2011 साली झाली. तिला ब्लॅकमेलिंग आणि विवाहबाह्य संबंधांमुळे 72 दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला आणि इथूनच तिचं आयुष्य बदललं.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिच्या जवळच्या नातेवाईकांनी तिच्याकडे तोंड फिरवलं. कमाईचा कोणताच मार्ग नसल्याने आणि घरच्यांनीही साथ सोडल्याने तिची आर्थिक परिस्थिती खालावली. मी अनेक रात्री गाडीमध्ये झोपून काढल्या असं ती सांगते. या परिस्थितीत तिच्या प्रियकराने तिची साथ दिली.

आपली प्रतिक्रिया द्या