ज्येष्ठ अभिनेते रमेश आणि सीमा देव ‘गुलमोहर’मधून येणार भेटीला

74

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात ते अगदीच खरं आहे. प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे झी युवावरील गुलमोहर ही लोकप्रिय मालिका. या मालिकेने त्यातील अप्रतिम गोष्टींद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘पत्र’ या आगामी गोष्टीतून महाराष्ट्राची आवडती कलाकार जोडी सीमा देव आणि रमेश देव प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ही गोष्ट एका ५० वर्षं जुन्या पत्रावर आधारित आहे, पण हे प्रेम पत्र नसून ब्रेकअप साठी लिहिलेलं पत्र आहे. अशाच एका प्रेमाच्या ब्रेकअपची गोष्ट सांगणारी ही पत्र नावाची कथा आहे.

रमेश देव आणि सीमा देव व्यतिरिक्त या कथेत श्रेया (आरती मोरे) आणि सुबोध (रोहन गुजर) नावाची तरुण पिढीतील दोन पात्रं आहेत. श्रेया आणि सुबोध हे एकमेकांवर अगदी मनापासून प्रेम करणारे आहेत मात्र काही कारणावरून त्यांचे ब्रेकअप होतं आणि श्रेया त्याचं दुखात घरी जाताना तिला रस्त्यात एक पाकीट सापडतं ज्यात फक्त १०० रुपये आणि एक अगदी जुन्याकाळातील लिफाफा सापडतो. त्यात एक चिठ्ठी देखील असते न राहून ती तो लिफाफा उघडून त्यातील चिठ्ठी वाचते, ती चिठ्ठी जवळ जवळ ५० वर्षा पूर्वी शालिनीने थत्ते यांना त्याच्या प्रेमाचे ब्रेकअप पत्र लिहिले आहे शालिनी आणि थत्ते यांचे देखील एकमेकांवर मनापासून प्रेम होते. मात्र घरच्यांच्या विरोधामुळे त्यांचे प्रेम पुढे फुलू नाही शकले आणि म्हणून शालिनीने ते ब्रेकअप पत्र थत्तेंसाठी लिहिले होते. ज्यामध्ये शालिनीने आपले ब्रेकअप झाले असले तरी आपल्यातल्या भावना मात्र कायम चिरतरुण राहतील, अशा आशयाचा मजकूर त्या पत्रामध्ये लिहिला होता.

आज ५० वर्षांनंतर देखील थत्ते आजोबांनी लग्न केले नसून ते आजही ते पत्र रोज वाचतात आणि शालिनीला आठवणींच्या रुपात स्वतःभोवतो असल्याचा आनंद घेतात ही गोष्ट जेव्हा श्रेयाला समजते, तेव्हा तिला देखील आपण कुठे तरी सुबोध सोबत खूप घाई करून चुकीचा तर निर्णय घेतला नाही ना, अस वाटायला लागतं. हे ती सगळं सुबोध सोबत शेअर करते आणि दोघे मिळून ठरवतात की आजोबा आणि शालिनी आजींशी परत भेट घडवून द्यायची. खरच श्रेया आणि सुबोध आज्जी आजोबांना भेटून देतील? त्या पत्रामुळे श्रेया आणि सुबोधच्या नात्यात परत प्रेम फुलून येईल का? ते मात्र तुम्हाला गुलमोहर ही मालिका पाहूनच कळेल.

आपली प्रतिक्रिया द्या