बॉम्बस्फोटात गमावलेला शरिराचा ‘प्रायव्हेट पार्ट’ डॉक्टरांनी बसवला

41
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । बल्टीमॉर

वैद्यकीय क्षेत्रातामुळे मानवी जीवन सुसह्य होत असलेल्या अनेक घटना आपल्या सभोवताली घडत असतात.ही बातमी देखील अशीच एका वैद्यकीय क्षेत्रीतील यशस्वी शस्त्रक्रीयेची आहे. अफगाणिस्तानमधील युद्धात शरिराचे  प्रायाव्हेट पार्ट गमावलेल्या एका सेवानिवृत्त सैनिकाला जननेंद्रीय ( पेनिस ) आणि वीर्यकोष परत मिळाले आहेत. अमेरिकन डॉक्टरांच्या टीमने तब्बल १४ तासा शस्त्रक्रीया करुन हे यशस्वी अवयव प्रत्यारोपण केले आहे. आता लवकरच हा सैनिक सामन्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगू शकेल.

या माजी सैनिकाचे नाव सध्या गुप्त ठेवण्यात आले आहे. ११ डॉक्टरांच्या टीमने यशस्वीपणे या सैनिकाचे टिश्यू ट्रान्सप्लांट केले आहे. मार्च महिन्यात बाल्टिमोरमधील जॉन हॉपकिन्स रुणालयात झालेल्या या शस्त्रक्रीयेत ९ प्लास्टीक सर्जन आणि २ युरोलॉजीकल सर्जन सहभागी झाले होते. अनेक वर्षांचे संशोधन, अभ्यास आणि मृत व्यक्तींच्या शरिरावर केलेल्या प्रयोगानंतर डॉक्टरांनी हे अवघड मिशन पूर्ण केले.

‘हा सैनिक रुग्णलायतून घरी परतल्यानंतर सामन्य व्यक्तींप्रमाणे आयुष्य जगू शकेल’ अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.  ‘ही संपूर्ण मनस्थितीवर परिणाम करणारी दुखापत होती. हे वास्तव स्विकारणे सोपे नव्हते’ अशी प्रतिक्रिया सैनिकाने दिली आहे.

यापूर्वी अशा प्रकारच्या शस्त्रक्रीयेत केवळ लिंग प्रत्यारोपण करण्यात आले होते. तसेच यामधील काहीच शस्त्रक्रीया यशस्वी झाल्या होत्या. मात्र या शस्त्रक्रीयेत एकूण चार अवयव बदलण्यात आल्याने ही शस्त्रक्रीया विशेष महत्त्वाची आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी २ ते ३ कोटी रुपये खर्च आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या