जेष्ठ मच्छिमार नेते राम भाऊ पाटील यांचे दीर्घआजाराने निधन

24

सामना ऑनलाईन । मुंबई 

जेष्ठ मच्छिमार नेते आणि वर्ल्ड फिश फोरम चे माजी सदस्य, नॅशनल फिश वर्कर्स फोरम,महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे माजी अध्यक्ष राम भाऊ पाटील (७९) ह्यांचे रविवारी मुंबईत निधन झाले.

राम भाऊ पाटील काही दिवसांपासून आजारी होते, त्याच्यावर अंधेरी येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवार पासून प्रकृति आणखी खलावत गेली, अखेर रविवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले.

राम भाऊ याच्यावर  त्यांच्या जन्मगावी पालघर जिल्ह्यातील  वडराई येथे सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, व एक मुलगी, नातवड़े असा परिवार आहे. रामभाऊ पाटील यांच्या निधनाने संपुर्ण मच्छिमार समाजावर शोककळा पसरली आहे.
देशभरातील मच्छिमारांना संघटीत करण्यामध्ये राम भाऊ पाटल यांचा मोठा वाटा होता. जागतिकीकरणानंतर देशातील मच्छिमारांना पहिला फटका बसला. त्याविरोधात रामभाऊ यांनी आपला आवाज बुलंद केला. थॉमस कोचेरी यांच्यासोबत जगभरातल्या मच्छिमारांच्या चळवळीत त्यांनी काम केलं. ओबीसींच्या प्रश्नांवरही ते सक्रिय असत. लोक भारतीच्या स्थापनेतही त्यांनी पुढाकार घेतला होता.

आपली प्रतिक्रिया द्या