अभिनेत्रींचे सौंदर्य फुलवणारे ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरीदादा जुकर यांचे निधन

1081

सिनेजगतातील प्रसिद्ध रंगभूषाकार पंढरी जुकर यांचे मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी 88 वर्षांचे होते.

‘ब्लॅक अँड व्हाईट’ चित्रपटांपासून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केलेल्या पंढरी यांना सिनेजगतामध्ये पंढरीदादा या नावाने ओळखले जायचे. चेहऱ्याचा जादूगार असलेल्या पंढरीनाथ जुकर यांना 2013 मध्ये राज्य शासनाचा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार मिळाला. तब्बल साठहून अधिक वर्षे पंढरीदादा चित्रपट क्षेत्रात होते. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘चित्रलेखा’ ‘ताजमहाल’, ‘नुर जहां’, ‘नील कमल’, ‘काला पत्थर’, ‘शोले’, ‘नागिन’, ‘मिस्टर इंडिया’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ अशा 500 हून अधिक चित्रपटांतील कलाकारांना त्यांनी रंग दिला.

pandhari-dada-jukar-1

मीना कुमारी, मधुबाला, नूतन, दिलीप कुमार, राज कपूर, अशोक कुमार, देव आनंद, राजेश खन्ना, सुनील दत्त, अमिताभ बच्चन, राज कुमार, शाहरुख खान, आमीर खान, करीना कपूर, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांचा मेकअप पंढरीदादा यांनी केला. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया दिग्गजांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या