विख्यात लेखक नागनाथ कोत्तापल्ले कालवश

ज्येष्ठ साहित्यिक आणि 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांचे बुधवारी कर्करोगाने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या मागे पत्नी डॉ. विजया, मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. वैपुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

कोत्तापल्ले हे राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्षही होते. सामाजिक भान असलेले लेखक म्हणून डॉ. कोत्तापल्ले यांची ओळख होती.

विविध साहित्य संमेलनांच्या अध्यक्षपदी निवड
मुंबईतले युवक साहित्य संमेलन, श्रीगोंद्यात आठवे ग्रामीण साहित्य संमेलन आणि कराडजवळ उंडाळे येथील साहित्य संमेलन, पुण्यातील पहिले औंध उपनगरीय मराठी साहित्य संमेलन (2003), अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.

कोत्तापल्ले यांना मिळालेले पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न. चिं. केळकर साहित्य पुरस्कार
महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
‘ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध’साठी परिमल पुरस्कार (1985)
‘ज्योतिपर्वसाठी केशवराव विचारे पारितोषिक (2002)
दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित पद्मश्री
डॉ. भवरलालजी जैन सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार (2018)
यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (2001)
‘राख आणि पाऊस’साठी बी. रघुनाथ पुरस्कार (1995)
‘राख आणि पाऊस’साठी महात्मा फुले पुरस्कार (1995)
‘साहित्य अवकाश’साठी शिरीष गांधी साहित्य पुरस्कार.