गाडी अपघातामधून तोगडिया बचावले, हत्येचा कट असल्याचा केला आरोप

17

सामना ऑनलाईन । सूरत

विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या स्कॉर्पिओ गाडीला बुधवारी सकाळी अपघात झाला. तोगडिया या अपघातात थोडक्यात बचावले असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. एका ट्रकने त्यांच्या बुलेटप्रुफ गाडीला मागच्या बाजूने धडक दिली. प्रवीण तोगडिया यांना झेड प्लस सुरक्षा आहे. मात्र, अपघात झाला तेव्हा तोगडिया यांच्या सुरक्षेसाठी असलेले सुरक्षारक्षक गाडीपासून फार मागे होते.

अपघातामागे कट असल्याचा आरोप तोगडिया यांनी केला आहे. राज्य सरकारने आपल्या सुरक्षेत बेजबबादारपणा दाखल्याबद्दल पोलिसात तक्रार करणार असल्याचेही तोगडिया यांनी सांगितले. विशेष म्हणजे याआधीच तोगडिया यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती. १५ जानेवारीला तोगडिया संशयीरित्या गायब झाले होते. त्यानंतर ते एका पार्कमध्ये बेशुद्धावस्थेत आढळले होते. त्यावेळीही त्यांना राजस्थान पोलीस आपल्या एन्काउंटर करणार असल्याची भीती व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या कारभारावर तोगडिया यांनी हल्लाबोल केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या