उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांचा राजीनामा

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या जागी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे तात्पुरता प्रभार देण्यात येणार आहे.

डॉ. पी. पी. पाटील यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिला असून विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. डॉ. पाटील यांच्या कार्यकाळ संपायला सुमारे सहा महिने शिल्लक असताना त्यांनी अचानक राजीनामा का दिला याबाबत माहिती मिळू शकली नाही. त्यांच्या जागी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे तात्पुरता प्रभार देण्यात येणार आहे. या अनुषंगाने मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायूनंदन हे 8 मार्च रोजी कार्यभार सांभाळणार आहेत.

गेल्या चार महिन्यापासून पाय व पाठीचे दुखणे वाढले होते. त्यात वजनही खुप कमी झाले. त्यामुळे बसून काम करणे कठीण झाले होते. त्या कारणामुळे राजीनामा दिल्याचे डॉ. पी. पी. पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या