उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू

53

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या नव्या उपराष्ट्रपतींसाठी संसदेत मतदान सुरू झालं आहे. या मतदानात राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांचे प्रतिनिधी सहभागी होतील. सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत मतदान होईल आणि लगेच मतमोजणी करुन संध्याकाळी ७ वाजेपर्यंत निकाल जाहीर केला जाणार आहे.

vp-voting

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्यावतीने व्यंकय्या नायडू आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएच्यावतीने गोपाळ कृष्ण गांधी हे उमेदवार म्हणून उभे आहेत. संसदेतील संख्याबळ पाहता व्यंकय्या नायडू यांचा विजय होईल असे दिसत आहे, मात्र त्यावर निवडणूक निकालानंतरच शिक्कामोर्तब होईल.

modi-voting

हमीद अन्सारी हे सध्या देशाचे उपराष्ट्रपती आहेत त्यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपणार आहे. नवे उपराष्ट्रपती ११ ऑगस्टपासून पदभार सांभाळणार आहेत. लोकसभेत एनडीएचे ३३८ खासदार आहेत तर एकट्या भाजपचे २८१ खासदार आहेत. राज्यसभेत भाजपचे ५८ आणि काँग्रेसचे ५७ खासदार आहेत.

निवडणुकीचे स्वरुप –

मतपत्रिकेवर निवडणूक चिन्ह नसेल, फक्त उमेदवारांची नावं असतील.

मतदानात राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांचे प्रतिनिधी सहभागी होतील. यात राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांचाही समावेश असेल.

राज्यसभा – २३३ खासदार आणि १२ राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले सदस्य

लोकसभा – ५४३ खासदार आणि २ राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले सदस्य

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे मिळून एकूण खासदार – ७९०

आपली प्रतिक्रिया द्या