
सामना ऑनलाईन। दुबई
रशियाची सुपर मॉडेल विकी ओडींटकोवा हिच्या एका धक्कादायक व्हिडीओमुळे सोशल साईटवर खळबळ उडाली आहे. विकी दुबईतील एका ७० मजली गगनचुंबी इमारतीला लटकल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. मेंदू बधिर करणारा विकीचा हा स्टंट बघून लाखोंनी तीला लाईक केल आहे. तर दुसरीकडे काहीजणांनी तिला बिनडोक म्हणत टीका केली आहे.
मॉडेलिंगच्या दुनियेत विकीची वेगळी ओळख आहे. हटके फोटोशूट हा तीचा छंद आहे. याच छंदापायी तीने २९ डिसेंबर २०१६ ला दुबईतील ७० मजल्याच्या सायान टॉवर या १००० फुटांपेक्षा जास्त उंच असलेल्या इमारतीला लटकून शूट केले. यात या व्हिडीओचा दिग्दर्शक अलेक्झांडर तिखोमिरोव याने विकीचा हात पकडून तीला आधार दिल्याच दिसत आहे. विकीने इन्स्टाग्रामवर या घटनेचा फोटो आणि व्हिडीओ टाकला आहे. तीच्या या फोटोला इन्टाग्रामवर ९९,००० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
तर काहीजणांनी तिचे हे कृत्य विकृत आणि बिनडोकपणाचे असल्याचे म्हटले आहे. तर विकीच्या काही चाहत्यांनी तिच्यातल्या साहसीपणाला सलाम केला आहे..
या व्हिडीओला आतापर्यंत ५१००० पेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर ४.२ लाखांपेक्षा जास्त वेळा हा व्हिडीओ पाहिला आहे.
तसेच विकीने ‘बिहाईंड द सीन्स’ नावाचा असाच एक व्हिडीओ डिसेंबर महिन्यात पोस्ट केला होता, तो १० लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.