व्हिडिओ-ठाण्यामध्ये शिवसेनेचा विजयोत्सव

29

सामना ऑनलाईन, ठाणे

ठाणेकरांनी शिवसेनेवर दाखवलेल्या विश्वासामुळे ठाणे महापालिकेमध्ये शिवसेनेच्या महापौर आणि उपमहापौर बिनविरोध निवडून आले. ठाणेकरांनी शिवसेनेवर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवत ठाणेकरांनी शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिले. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: ठाण्यामध्ये आले होते. ठाण्यामध्ये विजयी रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. ठाणेकरांनी या रोड शो ला कसा प्रतिसाद दिला ते पाहा

आपली प्रतिक्रिया द्या