Video – आदित्य ठाकरेंना धमकी; राज्याच्या गृहमंत्री वळसे पाटीलांचे सभागृहात निवेदन

dilip-valase-patil-site

राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकीच्या विषयावर आज राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी चर्चा झाली. आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांकडून देखील तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आमदार सुनील प्रभू यांनी यावर चिंता व्यक्त केल्यानंतर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी त्याविषयी आपली स्पष्ट भूमिका मांडल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सविस्तर निवेदन दिले. ज्यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याला कोर्टात हजर करण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले. तसेच SIT द्वारे या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले.

पाहा व्हिडीओ