Video : भिडे गुरूजींच्या कार्यकर्त्यांना जवानांचा ‘सलाम’, शिवप्रतिष्ठानचे कौतुक

2881

कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकणातील पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र सरसावला आहे. स्थानिक लोकांसह समाजसेवक, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी पुराच्या पाण्यात उतरले आहेत. या दरम्यान अनेकांनी ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी कुठे आहेत? असा सवाल उठवला होता. या प्रश्नाला आता लष्करातील जवानांनी ‘सलाम’ ठोकत उत्तर दिले आहे.

‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना मजबूत असून आम्हाला त्यांचा अभिमान आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांना माझा सलाम आहे. सचिन मोहिते याने आम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मदत केली. आमच्या खाण्याची, राहण्याची, नाश्त्याची सोय तो पाहात होता. आमचे काम तर त्यानी पाहिलेच, पण आम्हाला शेवटी जाण्यासाठीही त्याने मदत केली. संघटनेच्या अनेक मित्रांनी या कामी आम्हाला मदत केली, सर्वांची नाव मला माहिती नाहीत. त्यामुळे, मी सर्वांचे आभार मानतो’, अशा शब्दात लष्कराच्या जवानाने संभाजी भिंडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या कार्याचे कौतुक केले आहे.

‘संघटनेचे सर्वच कार्यकर्ते आमच्यासोबत होते. जेवढ आम्ही काम केले, त्याच्या दुपटीने तुमच्या कार्यकर्त्यांनी काम केलेय. तुमची आणि आमची अशीच एकता राहिली, तर आम्ही कुठेही फत्ते करू शकतो’, असे म्हणत जवानाने हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना ‘सलाम’ केला आहे.

आव्हाडांना उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुरादरम्यान भिडे गुरुजी कुठे आहेत? असा सवाल केला होता. त्यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोटो पोस्ट करून गुरुजी 2005 च्या पुराप्रमाणेच यावेळीही वयाच्या 87 व्या वर्षी पुरात उतरून काम करत असल्याचा खुलासा केला. आता तर जवानांनीच त्यांच्या कार्याला सलाम केल्याने आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या