Video फुटबॉल सामन्यात हाणामारी, एकमेकांना भिडले खेळाडू

सध्या संपूर्ण जगावर फिफा वर्ल्ड कपचा फिव्हर चढला आहे. या दरम्यानच फुटबॉलविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका सामन्यादरम्यान चक्क दोन्ही गटातील खेळाडू एकमेकांना भिडले. त्यांच्यात चक्क मैदानावरच हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ही घटना सध्या सुरू असलेल्या रशियन चषकात घडली आहे. जेनिट सेंट पीटर्सबर्ग आणि स्पार्टक मास्को या संघांमध्ये क्रेस्टोवस्की स्टेडियमवर सामना सुरू होता. सामना अखेरच्या एक्स्ट्रा टाईममध्ये असताना दोन खेळाडूंचा एकमेकांना धक्का लागला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना अपशब्द वापरले. त्यावरून सुरू झालेला वाद हा हाणामारीपर्यंत पोहोचला. पंचांनी त्या सर्वांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र खेळाडू ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आसले. या प्रकरणी पंचांनी सहा जणांना रेड कार्ड दिले आहे.