Video- स्टडी टुरच्या नावाने आमदाराचे तरुणीसोबत झिंग झिंग झिंगाट..

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहारमधील एक आमदार तरुणीसोबत अश्लील नृत्य करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा आमदार राष्ट्रीय जनता दलाचा असून यदुवंश कुमार यादव असे त्याचे नाव आहे. मणिपुर येथे स्टडी टुरच्या नावाने गेलेल्या आमदारांच्या लीलांचा व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

यदुवंश कुमार यादव आणि इतर तीन आमदार एक जून रोजी स्टडी टुरच्या निमित्ताने मणिपुरमधील मोरेह येथे गेले होते. मात्र स्टडी टूरच्या नावाने गेलेले आमदार मौजमजा आणि मुलीसोबत अश्लील चाळे करताना कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. यावेळी आमदार मुलीला जबरदस्तीने मिठी मारताना दिसत आहे. सोशल मिडियावर या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल होताच ‘तो मी नव्हेच’ असे म्हणत हा व्हीडीओ खोटा असल्याचा कांगावा करत या प्रकरणी संबंधितांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे आमदार यादव यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या