Video : जखमी बिबट्याचा फोटो काढणे नडले, बिबट्याने चवताळून लचके तोडले

1581

हातात कॅमेरा आल्यापासून माणूस नको तिथेही भलतेच धाडस करून, जीव धोक्यात घालून फोटो काढण्याचा प्रयत्न करतो. परंतु अनेकदा या प्रयत्नामध्ये जीवही गमवावा लागतो किंवा गंभीर जखमी व्हावे लागते. असाच एक प्रकार पश्चिम बंगालमधील अलिपूरदौर जिल्ह्यात समोर आला आहे. येथे जखमी बिबट्याचा जवळ जावून फोटो काढणे एका व्यक्तीच्या चांगलेच अंगाशी आले आहे. बिबट्याने चवताळून फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर झडप घातली. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका जखमी बिबट्याचा एक व्यक्ती अंत्यंत जवळ जावून फोटो काढताना व्हिडीओत दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला अन्यही काही लोक दिसत आहे. परंतु अचानक बिबट्या फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर झेप घेतो आणि त्याला खेचत नेतो. परंतु जखमी असल्याने तो त्या व्यक्तीला अधिक दूर नेऊ शकत नाही. सुदैवाने तो व्यक्ती बिबट्याच्या तावडीतून सुटतो आणि त्याचा जीव वाचतो. परंतु त्या व्यक्तीला बिबट्याच्या नख्या आणि दात लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या