Video – IPL विराटने ‘फ्लाइंग किस’ दिला, मॅक्सवेल आधी गोंधळला नंतर हसला…

virat-kiss

IPL-14 च्या 16 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) राजस्थान रॉयल्सला (RR) 10 विकेटने मात दिली. आरसीबीच्या विजयात कर्णधार विराट कोहलीचा सिंहाचा वाटा होता. विराटने नाबाद 72 धावा केल्या. आयपीएलच्या या सिझनमध्ये विराट कोहलीचं हे पहिलं अर्धशतक होतं.

virat

विराटनं आपलं अर्धशतक पूर्ण केल्यावर फ्लांइग किस दिला, डगआउट मध्ये बसलेला त्याचा सहकारी ग्लेन मॅक्सवेल मात्र चांगलाच गोंधळला. विराटच्या पुढल्या अॅक्शनने त्याला समजलं की ‘फ्लाइंग किस’ कुणासाठी होता. त्यानंतर मॅक्सवेल हसताना दिसला. विराट कोहलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानं हे अर्धशतक आपली मुलगी वामिकाला समर्पित केलं. सामना पाहात असलेल्या अनुष्कानेही विराटचं टाळ्यांनी स्वागत केलं.


View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

व्हिडीओ मध्ये विराट डगआउटमधील आपल्या टीमच्या सदस्यांच्या दिशेनं आपली बॅट दाखवता दिसत आहे. यानंतर त्यांनी आपली पत्नी अनुष्का शर्माच्या दिशेनं फ्लाइंग किस दिला. सर्वांना तो फ्लाइंग किस अनुष्कासाठी आहे असं वाटलं. पण त्यानंतर त्यानं बाळाच्या पाळण्याचा हात केला. म्हणजे त्यानं वामिकाला आपलं अर्धशतक समर्पित केलं होतं.

सामन्यात राजस्थान रॉयल्स टॉस हरला होता. पहिली फलंदाजी करताना 20 षटकात त्यांनी 177/9 धावा केल्या. शिवम दुबेने 46 आणि राहुल तेवतियाने 40 धावा केल्या. आरसीबीसाठी मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल यांनी तीन-तीन विकेट घेतल्या.

आरसीबीच्या व्यवस्थापनाने खेळाडूंच्या कुटुंबीयांना देखील उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. अनुष्का शर्मा आणि तिची मुलगी कोहलीसोबत प्रवास करू शकत आहेत. अनुष्का गेल्यावर्षी आयपीएलसाठी संयुक्त अरब अमीरात (UAE) मध्ये गेली होती. यावर्षी जानेवारीमध्ये विरुष्काच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं.

आपली प्रतिक्रिया द्या