Video- माजलगावात मोकाट गायींचा महिलांवर हल्ला

1667

माजलगाव शहरामध्ये एका मोकाट गायींनी हैदोस घातला असून त्यांनी शनिवारी वेगवेगळ्या ठिकाणी चार महिलांवर चवताळून हल्ला केला व अक्षरशः त्यांना शिंगानी व पायांनी तुडवून काढले. या घटनांपैकी एका हल्ल्याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गायींनी दोन महिलांवर हल्ला केल्याचं दिसून येत आहे. या हल्ल्यात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यातील एकीची प्रकृती अत्यवस्थ आहे.

माजलगाव शहरात मोकाट गायींनी उच्छाद घातला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास प्रभाग एक मधील रहिवासी पुष्पाबाई साखरे व मुक्ताबाई भिसे या दोघींवर दोन गायींनी अचानक हल्ला केला. त्वेषाने अंगावर येत या गायींनी महिलांना शिंगानी व पायांनी तुडवून काढले. गायीला पकडण्याचा आठ दहा तरुणांनी प्रयत्न केला. परंतु गाय मुक्ताबाई यांना शिंगावर घेऊन आपटत राहिली. तिने पुष्पाबाई यांना पायाने तुडवल्याने पुष्पाबाईंच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. तर मुक्ताबाई यांच्या गळ्यात शिंग घुसले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगरला हलवण्यात आले आहे.

दरम्यान भागात दुसऱ्या ठिकाणीही दोन महिला व एका मुलीला गायीने मारल्याची घटना घडली आहे. मोकाट गायींच्या अशा हल्ल्यांमुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

पाह या हल्ल्याचा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या