VIDEO – आयपीएलपूर्वी धोनीची लेकीसोबत धमाल-मस्ती!

23
फोटो सौजन्य - महेंद्रसिंह धोनीचे इंस्टाग्राम अकाऊंट

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थान संघाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून परतल्यानंतर धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. धोनी ही सुट्टी आपली पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासोबत सुट्टी उपभोगत आहे. या सुट्टीतील धमाल मस्तीचा एक व्हिडीओ धोनीने नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

धोनी या व्हिडीओमध्ये साक्षी आणि जीवसोबत आपल्या घरातील हिरवळीवर आराम करताना दिसतोय. तसेच धोनीच्या घरातील वेगवेगळी कुत्रेही यामध्ये आहेत. धोनी कुत्र्यांना खेळवतानाचाही प्रसंग या व्हिडीओमध्ये आहे.

‘फन टाईम विथ फॅमिली’ असे कॅप्शन धोनीने या व्हिडीओला दिले आहे. धोनीने यापूर्वीही जीवासोबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यंदा तब्बत ३ महिन्यानंतर धोनीने इंस्टाग्रामवर नवी पोस्ट टाकली आहे. त्याच्या नव्या पोस्टकडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांमध्ये ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

Fun time with the family

A post shared by @ mahi7781 on

या आयपीएलमध्ये धोनी तब्बल दोन वर्षांनी चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करणार आहे. धोनीसोबत सुरेश रैना, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रोव्हो आणि फॅफ ड्यूप्लेसी हे चेन्नईचे जुने खेळाडू पुन्हा एकदा पिवळ्या जर्सीमध्ये आयपीएलमध्ये खेळतील. तसेच शेन वॉटसन, केदार जाधव, हरभजन सिंग आणि लुंगी निगडी हे खेळाडू यंदा पहिल्यांदाच चेन्नई सुपरकिंग्जकडून आयपीएल खेळणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या