जगण्यासाठी धडपड, 95 वर्षीय आजोबांचा व्हिडीओ पाहून नेटकरी भावुक

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱया एका व्हिडिओने नेटिझन्सचे लक्ष केधले आहे. ज्यामध्ये एका 95 वर्षीय आजोबांची पैसे कमावण्यासाठीची धडपड पाहून नेटकरी भावुक झाले आहेत.अंगावरील जबाबदारीच्या ओझ्यामुळे निवात घरी आराम करण्याच्या वयात देखील आजोबांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.

लग्न सोहळ्यामध्ये आजोबा ताशा वाजवत आहेत. वयोमानानुसार त्यांना चालताना आणि उठताना होणारा त्रास स्पष्टपणे दिसत आहे. तरीही ते आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावताना दिसत आहेत. अनेकांनी आजोबांच्या जिद्दीचे कौतुक केले आहे. आजोबांचा हा व्हिडीओ पाहून आपल्याला प्रेरणा देत असल्याच्या कमेंट्स नेटिझन्सने केल्या आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by pandey Rutvik (@mr_pandeyji_198)