Video – भयंकर! तुम्ही कधी छोले भटुरे आईस्क्रीम खाल्ले आहे का?

हल्ली आईस्क्रीममध्ये हवे ते फ्लेवर आपल्याला आपल्या समोर बनवून दिले जातात. ताजी फळं, चॉकलेट, गुलकंद, मिरची, पाणीपुरी, पुरणपोळी, मोदक असे हवे ते फ्लेवर मिळतात. मात्र कधी तुम्ही कुठल्या भाजीच्या फ्लेव्हरचे आईस्क्रीम खाल्ले आहे का? नसेल खाल्ले तर हा व्हिडीओ नक्की बघा.

स्ट्रीट फूड वर्ल्ड या चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्यात छोले भटुरेपासून आईस्कीम तयार करण्यात आले आहे. या आईस्क्रीममधध्ये छोलेची भाजी, भटुरे, कांदा, पुदिन्याची चटनी वापरलेली आहे. नंतर हे सर्व पदार्थ गोड दुधासोबत मिक्स करून त्याचे आईस्क्रीम तयार करण्यात आले आहे.

या व्हिडीओवर नेटकरी भडकले असून त्यांनी असे आईस्क्रीम बनवण्यावरून त्यांनी त्या दुकानदाराला ट्रोल केले आहे.