सावधान दादर मार्केटमध्ये गाजरे घेताय! त्याआधी पाहा हा व्हिडीओ

2540

पालिकेच्या दादर मार्केटमधून जर तुम्ही गाजरे विकत घेत असाल तर तुमच्या आरोग्याला धोका आहे. कारण इथे ड्रममध्ये चक्क कमरेइतक्या पाण्यात पायाने गाजरे धुतली जात असल्याचा प्रकार एका व्हिडीओद्वारे उघडकीस आला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर पालिकेने मंडईतील अस्वच्छ गाळेधारकांना दंड ठोठावला आहे. बाजार विभागाने संबंधितांना नोटीसही बजावली आहे.

अलीकडेच कुर्ला रेल्वे स्थानकात अस्वच्छ हाताने लिंबू सरबत तयार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता गाजरांचा प्रकार समोर आला असल्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

– दादर पश्चिम येथील क्रांतीसिंह नाना पाटील मंडईत पायाने गाजर धुतले जात असल्याचा व्हिडीओ सोमवारी व्हायरल झाला होता. याची गंभीर दखल घेत बाजार विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगीता हसनाळे यांनी ही धडक कारवाई केली.

या गाळय़ांवर कारवाई-
बुधकारी गाळा क्रमांक 47, 60, 55, 66, 129, 173, 186 वर अस्वछता केल्याबद्दल एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे, तर गाळा क्रमांक 173, 186, 90, 152, 129, 66, 57, 60, 55 बाजार विभागाच्या नियमानुसार पहिली नोटीस पाठविण्यात आली आहे. त्याचबरोबर गाजर धुण्याचे मोठे 19 ड्रम, एक छोटा ड्रम जप्त करून पालिकेने आपल्या ताब्यात घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या