
सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये हिंदुस्थानी इन्फ्लुएन्सर शादाब हसन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली हे एका लिफ्टमध्ये एकत्र दिसतात. त्यांच्यात एक छोटासा, पण भन्नाट संवाद होतो. लिफ्टमध्ये शादाब हसनने ब्रेट लीकडे बघत हिंदीत विचारले, ‘10 वाला बिस्कीट कितने का है जी?’ हे ऐकताच लिफ्टमधले सगळे लोक हसू लागले. ब्रेट ली मात्र क्षणभर गोंधळला. त्याला काही समजले नाही. त्यादरम्यान लिफ्टमधील एक जण म्हणतो, ‘त्याची हिंदी तर आपल्यापेक्षा चांगली आहे!’ हे ऐकून सगळे हसतात. शेवटी ब्रेट लीने हसतच उत्तर दिले, ‘आप सभी को थैंक यू,’ त्याच्या हिंदी उच्चारामुळे सगळे पुन्हा हसू लागतात. आतापर्यंत 16 दशलक्षांहून अधिक ह्युज, सात लाखांहून अधिक लाइक्स आहेत.































































