Video- ट्रेन आणि फलाटामध्ये पडलेल्या महिलेला वाचवण्यात यश

22

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

कोल्हापूर रेल्वे स्थानकावर धावती ट्रेन पकडताना झालेल्या अपघाताचा थरार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सुरू झालेली ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात एक महिला प्रवासी ट्रेन व फलाटामध्ये पडली. मात्र रेल्वे स्थानकावरील दोन टीसींनी प्रसंगावधान दाखवून या महिलेला ट्रेनखाली जाण्यापासून वाचवले.

कोल्हापूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 2 वर शुक्रवारी एक महिला भीषण अपघातातून सुखरूप बचावली आहे. ट्रेन सुरू झालेली असताना या महिलेने गाडीत चढण्याचा प्रयत्न केला मात्र तोल गेल्यामुळे ती ट्रेन आणि फलाटामध्ये सापडली. सुदैवाने यावेळी शंभू कुमार आणि कौशल किशोर या दोन टीसींनी प्रसंगावधान दाखवून या महिलेला बाजूला खेचल्याने अनर्थ टळला.

आपली प्रतिक्रिया द्या