मुक्ताच्या ‘त्या’ व्हिडिओने सोशल मीडियामध्ये खळबळ

9

सामना ऑनलाईन । मुंबई

”एक तर मी तुरुंगात आहे , मला किडनॅप केलंय किंवा माझा खून झालाय … पण तुम्हाला सत्य कळायलाच हवं .. मी तुम्हाला सत्य सांगायलाच हवं …” या आशयाचा एक व्हिडिओ नुकताच अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने तिच्या फेसबुक पेजवर अपलोड केला आणि एकच कल्लोळ उडाला. या व्हिडिओत मुक्ता अतिशय घाबरलेली दिसत आहे, तिच्या चेहऱ्यावर घाम आणि कपाळावर रक्त दिसतंय. हा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर सुद्धा वायरल झालाय.

मुक्ताच्या फेसबुक पेजवर अंदाजे १.२५ लाख फॉलोअर्स आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत २० हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे, तर १०० च्यावर तो फेसबुक वर शेअर झालाय. व्हाट्सअॅपच्या शेअर्सची तर गणतीही नाही. मुक्ताच्या पेजवर १०० च्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कंमेंट्स सुद्धा झाल्या आहेत. पण नक्की काय आहे, हे मात्र अजूनही समजले नाही. सध्याच्या ऑनलाईन जगात मुक्ताच्या या विचित्र व्हिडिओची चर्चा मात्र तुफान सुरू आहे.

मुक्ता नेमकी इतकी कुणाला आणि कशासाठी घाबरली आहे आणि त्यामागे कोणतं सत्य लपलं आहे हा लोकांच्या उत्सुकतेचा विषय झाला आहे. काहीजण मुक्ताला काळजी घ्यायला सांगत आहेत, तर काहींच्या मते नवीन चित्रपट, मालिका किंवा एखाद्या नवीन नाटकाचं प्रमोशन आहे. नक्की काय आहे हे पाहण्यासाठी मात्र मुक्ताच्या पुढील व्हिडिओची किंवा मुक्ताच्या ऑफिशिअल स्टेटमेंटची वाट पाहूया..

पाहा हा व्हिडिओ-

आपली प्रतिक्रिया द्या