Video : प्रियंका गांधींच्या उपस्थितीत कार्यकर्त्याचा वार्ताहरावर हल्ला, भाजप आक्रमक

445

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांच्या उपस्थितीत एका कार्यकर्त्याने वार्ताहरावर हल्ला केला.उत्तर प्रदेशमध्ये सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबारा मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रियांका गांधी वढेरा आल्या होत्या. यावेळी ही घटना घडली. याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत असून काँग्रेसवर प्रचंड टीका होत आहे.

प्रियंका गांधी वढेरा यांच्या उपस्थितीत सोनभद्र येथे मृतांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आल्या असता त्यांचे सहकारी संदीप सिंह यांनी वार्ताहाराने एक प्रश्न विचारला. यानंतर भडकलेल्या संदीप सिंह यांनी वार्ताहारासोबत अशोभनीय कृत्य केले आणि धमकी दिली. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवला असून प्रियंका यांच्या सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास करत आहे.

पाहा व्हिडीओ –

आपली प्रतिक्रिया द्या