Video- हृदयद्रावक! मेलेल्या आईला उठण्यासाठी बाळाचे प्रयत्न पाहून तुमचेही डोळे पाणावतील

2607

बिहारमधील मुझ्झफरपूर स्थानकावर एका मजूर महिलेचचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मजूर महिलेचे छोटेसे बाळ तिला उठविण्याचा प्रयत्न करत असतानाचा एक व्हिड़ीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ अगदी मन हेलावून टाकणारा आहे. या महिलेचा मृत्यू कशाने झाला ते अद्याप समजलेले नाही. मात्र तिच्या बाळाचा व्हिडीओ मात्र देशभरातील जनतेच्या डोळ्यात पाणी आणत आहे.

अरबिना खातून असे त्या महिलेचे नाव असून ती गुजरातवरून तिची दोन मुलं, तिची बहिण, बहिणीचा पती यांच्यासह श्रमिक ट्रेनने मुझ्झफरपूरला येत होती. तिथून ते सर्वजण त्यांच्या कतिहार या गावी जाणार होती. मात्र रेल्वेस्थानकावरून कतिहारला जाणाऱ्या गाडीची वाट पाहत असतानाच तिचा मृत्यू झाला. तिची बहिण व भावोजी गाडीची शोधशोध करायाला गेलेले असताना हा प्रकार घडला. त्यावेळी अरबिनासोबत तिची दोन लहान मुलं होती. ती मुलं वेगवेगळ्या प्रकारे निपचीत पडलेल्या आपल्या आईला उठविण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी तेथून जाणाऱ्या काहींनी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला.

अरबिनाचा मृत्यू कशाने झाला ते अद्याप समजले नाही. मात्र अरबिनाला काहीतरी आजार होता असे तिच्या भावोजींनी प्रसारमाध्यमांना सांगितले. अरबिना आजारी होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून प्रवासातील गरमी, त्यात खायला नीट अन्नपाणी नाही त्यामुळे अरबिनाचा मृत्यू झाल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या