व्हिडीओ : तुकोबांच्या पालखीचे रोटी घाटातील नयनरम्य दृष्य

48

सामना ऑनलाईन । पुणे

पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत तुकाराम महाराजांची पालखीने गुरुवारी विठ्ठल नामाचा जयघोष करीत नयनरम्य पण अवघड असा रोटी घाट पार केला. हा घाट पार करण्यासाठी तुकोबारायांच्या पालखी रथाला नेहमीच्या बैलजोडी व्यतिरिक्त चार स्थानिक खिल्लारी बैल जोड्या जुंपण्यात आल्या होत्या. वरवंड ते पाटसपर्यंत दर्शनासाठी महामार्गावर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. काही भाविक वरवंड ते रोटीपर्यंतच्या पायी प्रवासात दिंडीत सहभागी झाले. प्रत्यक्ष पांडुरंगच पायवाट सोपी करतो, या विश्वासाने वारकऱ्यांनी घाटमार्गाचा अवघड टप्पा ओलांडला. या प्रशस्त मार्गामुळे पालखीमार्गाला शोभा आली. तुकोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम उंडवडी (गवळ्याची) येथे असणार आहे.

पाहा व्हिडीओ :

आपली प्रतिक्रिया द्या