…अन् लाईव्ह शोमध्ये अरिजित सिंगनं दिल्या शिव्या

27

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या गायकांमधील एक अरिजित सिंगचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अरिजित एका लाईव्ह शोदरम्यान शिव्या देताना दिसत आहे. कमी कालवधीच मिळालेलं अरिजितच्या डोक्यात गेल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. अरिजितचा हा व्हिडिओ त्याच्या काही वर्षांपूर्वीच्या एका लाईव्ह शोमधला आहे.

या व्हिडिओत अरिजित ‘रॉकस्टार’ सिनेमातील ‘नादान परिंदे’ गाणं गात गिटार वाजवताना दिसत आहे. मात्र अचानक स्टँडवर लावलेला त्याचा माइक खाली घसरू लागतो. यामुळे संतापलेला अरिजित स्टेजवरूनच शिव्या देत माइक ठीक करायला सांगतो. त्यानंतर लगेचच काही स्पॉट बॉय तिथे आले आणि त्यांनी माईक ठिक केला आणि त्यानंतर उरलेलं गाणं अरिजित पूर्ण करतो. मात्र नेहमी शांत आणि संय्यमी असलेल्या अरिजितचा हे रुप पाहून त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल देखील केलं.

आपली प्रतिक्रिया द्या