Video- सुरक्षा रक्षकाला भोवळ आली, राष्ट्रपती मदतीसाठी धावले

980

नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या एका जाहीर कार्यक्रमात महिला सुरक्षा रक्षकाला भोवळ आल्याची घटना घडली आहे. महिलेला भोवळ आल्याचं पाहून राष्ट्रपती रामनाथ कोविंदही व्यासपीठावरून खाली उतरले आणि त्यांनी तिची विचारपूस केली आहे. या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. 

नवी दिल्ली येथे नॅशनल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबिलिटी पुरस्कारांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या पुरस्कार सोहळ्याला कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत गायन झालं. त्यावेळी तिथे उपस्थित असलेली एक महिला सुरक्षा रक्षक भोवळ येऊन पडली. महिला खाली कोसळताच काहीवेळ हलकासा गोंधळ उडाला. महिलेला भोवळ आल्याचं कळताच व्यासपीठावर आलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अर्तमंत्री निर्मला सीतारमण आणि राज्यमंत्री अनुराग ठाकूर हे तिघेही जण व्यासपीठावरून खाली उतरले.

खाली उतरल्यानंतर ते थेट महिलेकडे गेले आणि त्यांनी तिच्या तब्येतीची चौकशी केली. अनुराग ठाकूर यांनी तिला पिण्यासाठी पाणी दिलं. महिलेची तब्येत ठीक आहे, असं कळल्यानंतर राष्ट्रपती पुन्हा व्यासपीठावर जाऊन स्थानपन्न झाले. राष्ट्रपतींच्या या कृतीचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. इतक्या मोठ्या पदावरची व्यक्ती एखाद्या लहान पदावरील व्यक्तिसाठी धावून जाते, हे स्पृहणीय असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.  

पाहा व्हिडीओ-

 #WATCH A woman security personnel deputed at National Corporate Social Responsibility Awards event collapsed during playing of National Anthem, today.President Kovind, FM Nirmala Sitharaman & MoS Finance Anurag Thakur came down the stage to inquire about her health. #Delhi pic.twitter.com/HUSvzkizHu

आपली प्रतिक्रिया द्या