विधानपरिषद निवडणूक – भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात, एकनाथ खडसेंच्या दाव्याने खळबळ

विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी मतदान सुरू आहे. दहा जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे सहा तर भाजपच्या पाच उमेदवारांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. दहाव्या जागेसाठी अतिरिक्त एक उमेदवार मैदानात उतरवल्याने चूरस वाढली आहे. यात कोण बाजी मारणार हे आज सायंकाळी स्पष्ट होईलच, परंतु तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी मतदानापूर्वी मोठा दावा केला.

भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार माझ्या संपर्कात आहेत. पण ते पक्षाला सोडून मततान करतील अशी अशी परिस्थिती नाही, असे विधान एकनाथ खडसे यांनी केले आहे. विधानभवनाकडे रवाना होताना त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवात साधला. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपेच काही आमदार तुम्हाला मतदान करणार असल्याची चर्चा असल्याचे खडेंना विचारण्यात आल्यावर त्यांनी भाजपचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचे मान्य केले.

राज्यसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीला काही कारणामुळे अपयश आले. परंतु त्या पराजयाचा वचपा काढण्यासाठी महाविकास आघाडी जय्यत तयारीने उतरली असून सर्व नेते, आमदार तयार आहेत, असे एकनाथ खडसे म्हणाले. तसेच महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील असेही ते म्हणाले. तसेच भाजपच्या अनेक आमदारांशी माझे चांगले संबंध आहेत. ते संपर्कता आहे ही गोष्ट खरी असली तरी ते पक्षाला सोडून मला मतदान करतील अशी परिस्थिती सध्या नाही, असेही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.

विधानपरिषद निवडणूक – आमदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, धमक्यांचे निरोप; पण महाविकास आघाडी एकजूट!

भाजपचे आमदार आघाडीच्या संपर्कात – नाना पटोले

महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये समन्वय आहे. आघाडीशी जुळलेले अपक्ष आणि लहान पक्षही सोबत आहेत. राज्यसभा निवडणुकीत ज्या काही चूका झाल्या त्या यावेळी होणार नाहीत. भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणात अंतर्गत कलह असून त्यांचे आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

भाजपचे जुळता जुळेना

भाजपचे चार उमेदवार निवडून येणार असले तरी पाचव्या उमेदवारासाठीचे त्यांचे गणित जुळताजुळेनासे झाले आहे. राज्यसभेला झालेल्या 123 मतांच्या बेगमीवर अलंबून असलेल्या भाजपला ती मते धरली तरी पाचव्या उमेदवारासाठी 12 ते 13 मते अतिरिक्त मिळवायची आहेत. राज्यसभेला मिळालेली मते यावेळी मिळतील याची खात्री नसल्याने हे गणीत अगदी 22 ते 23 अतिरिक्त मतांपर्यंत जात आहे. त्यामुळे आमदारांना हॉटेलवर ठेवल्यापासून सुरू असलेल्या जोर बैठकांतून सुरू असलेली त्यांची गणिताची जुळवाजुळव शेवटच्या क्षणापर्यंत संपलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

काय आहे गणित?

– विधानसभेतील बलाबल – 285 सदस्य
– विजयासाठी मतांचा कोटा – 26
– शिवसेनेची मते 55, उमेदवार 2, अतिरिक्त मते 3
– राष्ट्रवादी मते 51, उमेदवार 2, 1 मताची गरज
– काँग्रेस मते 44, उमेदवार 2, 8 मतांची गरज
– भाजप मते 106, उमेदवार 5, 24 मतांची गरज
– अपक्ष व इतर लहान पक्षांची मते 29