संभाजीनगर-जालना विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक 19 ऑगस्टला

14

सामना ऑनलाईन, मुंबई

महाराष्ट्र विधान परिषदेच्या संभाजीनगर-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 19 ऑगस्ट 2019 रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिध्दी पत्रक काढून ही माहिती दिली आहे. संभाजीनगर-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आमदार सुभाष झांबड यांची मुदत 29 ऑगस्ट 2019 ला संपत आहे. यामुळे रिक्त होणाऱ्या जागेसाठी आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुकीची अधिसूचना 25 जुलै 2019 रोजी जारी होईल. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 1 ऑगस्ट 2019 असून अर्जांची छाननी दुसऱ्या दिवशी 2 ऑगस्टला होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2019 आहे. निवडणुकीसाठी मतदान 19 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 या वेळेत होईल. मतमोजणी 22 ऑगस्ट 2019 रोजी होईल.संभाजीनगर-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आज पासून तत्काळप्रभावाने निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.