‘वर्षा’ मुख्यमंत्र्यांचा अधिकृत सरकारी बंगला कधी झाला?

2965

1 मे 1960 ते 1962 पर्यंत यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. याच काळात चीनसोबत युद्ध सुरु असल्याने त्यावेळचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांना केंद्रातील राजकारणात बोलावून घेतले आणि त्यांना संरक्षणमंत्री पदाची जवाबदारी सोपवली. यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये गेल्यानंतर मारोतराव कन्नमवार यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली.

yashwantrao-chavan

महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून कन्नमवा यांनी पदभार स्वीकारला. 20 नोव्हेंबर 1962 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. परंतु मुख्यमंत्रीपदी वर्ष पूर्ण झाल्यानंतर अवघ्या चौथ्या दिवशी (24 नोव्हेंबर, 1963) त्यांचे सरकारी बंगल्यातच निधन झाले.

marotrao-kannamwar

कन्नमवार यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधानंतर मधल्या काळामध्ये पी.के. उर्फ बाळासाहेब सावंत यांनी 24 नोव्हेंबर 1963 ते 5 डिसेंबरपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी वसंतराव नाईक यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली.

कन्नमवार यांचे निधन सरकारी बंगल्यात झाल्याने त्यांच्यानंतर मुख्यमंत्री बनलेल्या वसंतराव नाईक यांनी तो बंगला बदलून ‘वर्षा’ या बंगल्यात राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकृत सरकारी बंगला म्हणून ‘वर्षा’ बंगला ओळखला जावू लागला.

vasantrao-naik

आपली प्रतिक्रिया द्या