बँकांमधील मोठय़ा रकमेच्या व्यवहारावर आयोगाचा वॉच

687

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळातही दारू, रोख रकमेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. इन्कम टॅक्स व सीमाशुल्क विभागाची भरारी पथकेही कार्यरत करण्यात आली असून बँकाँमधून होणाऱया मोठय़ा रकमांच्या व्यवहारावर निवडणूक आयोगाचा वॉच राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी सांगितले. राज्यातील मतदारनोंदणीची प्रक्रिया निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत म्हणजे 4 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी नोंदणी करणाऱयांना निवडणुकीत मतदान करता येईल. त्यामुळे ज्यांची नोंदणी झालेली नसेल अशा व्यक्तीनी आपली नोंदणी करून घ्यावी असे आवाहन सिंह यांनी यावेळी केले.

मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली.

सी व्हिजीलचा वाँच
निवडणूक आचारसंहितेचा भंग होत असल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सी व्हिजिल नावाचे मोबाईल अँप विकसित केले आहे. आचारसंहिता भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास फोटो किंवा व्हिडिओ पाठवून सी व्हिजिल अँपवर तक्रार नोंदवता येईल.

टोल फ्री क्रमांक
मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी व तक्रारींसाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक आहे. राज्यस्तरावर चोवीस तास हा टोल फ्री क्रमांक सुरू राहिल.

मतदारांची संख्या
(31 ऑगस्ट 2019 नुसार)
पुरुष मतदार –    4 कोटी 67 लाख 37 हजार 841
महिला मतदार –  4 कोटी 27 लाख 5 हजार 777
तृतीयपंथी –        2 हजार 593
अपंग मतदारांची संख्या – 4 कोटी 27 लाख 3 लाख 60 हजार 885
एकूण मतदार – 8 कोटी 94 लाख 46 हजार 211

मतदान केंद्रे- 96 हजार 654
2014च्या तुलनेत यंदा मतदान केंद्राच्या संख्येत 5 हजार 325 नी वाढ झाली.
2014च्या तुलनेत मतदारांच्या संख्येत 59 लाख
17 हजार 901 इतकी वाढ झाली आहे.

850 कोटींची तरतूद
राज्यातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी अर्थसंकल्पात 850 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 2014च्या विधानसभा निवडणुकीत सुमारे 793 कोटी रुपये खर्च झाले होते.

गिरगावात 67 लाखांची रोकड सापडली
निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच मुंबई पोलिसांनी रोकड पकडली. अतिरिक्त आयुक्त निशित मिश्रा आणि उपायुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने गिरगावच्या पोफळवाडीतील एका दुकानातून 67 लाखांची रोकड जप्त केली. हे पैसे पुढील तपासासाठी आयकर खात्याकडे देण्यात येतील असे सांगण्यात आले.

सातारा लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर
सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होईल, मात्र तेथील निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केलेली नाही. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी साताऱयात दोन्हीही निवडणुका एकत्र होतील असे म्हटले होते, पण तसे झाले नाही. सातारा पोटनिवडणूक विधानसभेवेळीच होणार नसली तरी नंतर कधी होईल हे मात्र निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले नाही.

2014 चे चित्र
भाजप   122
शिवसेना 63
काँग्रेस   42
राष्ट्रवादी 41
इतर     20

महाराष्ट्र
विधानसभा कार्यकाळ समाप्त-9 नोव्हेंबर

एकूण जागा 288
राज्यातील मतदार-8 कोटी 94 लाख

ईव्हीएम-1.8 लाख

हरयाणा
2 नोव्हेंबर
विधानसभा कार्यकाळ समाप्त
एकूण जागा-90
राज्यातील मतदार-1 कोटी 82 लाख
ईव्हीएम-1.3 लाख

आपली प्रतिक्रिया द्या